Shilpa Shetty ने सुपरवुमन बनून केली 'Nikamma' चित्रपटाची घोषणा; जाणून घ्या काय आहे अभिनेत्रीच्या नव्या अवताराचे रहस्य?
Shilpa Shetty (PC - Instagram)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीचं तिच्या नवीन लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी 'निकम्मा' (Nikamma) चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने सुपरवुमनच्या अवतारातील स्वतःचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीचे केस उडत असून तिने हातात तलवार घेतली आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना आवडला असून लोक तिला या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारत आहेत. तुम्हालाही शिल्पाच्या या लूकबद्दल आणि चित्रपटाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी पूर्ण वाचा...

शिल्पा शेट्टीचा 'निकम्मा' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता अभिनेत्रीने चित्रपटाची घोषणा केली आहे आणि सांगितले आहे की, 'निकम्मा'चा ट्रेलर उद्या म्हणजेच 17 मे रोजी रिलीज होणार आहे. हा अॅनिमेटेड व्हिडीओ पाहून शिल्पा शेट्टी धमाकेदार एन्ट्री करणार असल्याचे दिसते. (वाचा -  Ketaki Chitale Derogatory Post Case: केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ; वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी देहू संस्थानची अभिनेत्री विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी)

शिल्पा शेट्टीचा दमदार लूक -

शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा सुपरवुमनसोबतचा दमदार लूक दिसत आहे. व्हिडिओमध्ये वीज चमकत असून शिल्पाच्या हातात तलवार दिसत आहे. शिल्पाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. शिल्पाचा लूक खूपच मजबूत दिसत असून या पात्राचे नाव अवनी असेल.

व्हिडिओ पोस्टर शेअर करताना शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'आम्ही एका नव्या अवतारात बोलत आहोत. खरी अवनी कोण? माझ्यासाठी हे पहा आणि तुमचे प्रेम द्या. निकम्माचा ट्रेलर उद्या 17 मे रोजी सकाळी 11.30 वाजता लाँच होत आहे.

शिल्पा शेट्टीचा हा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. यापूर्वी शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सामील झाली आहे. आता तिचा हा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे, 'आणखी एक मोठा धमाका.' तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले - 'वेलकम बॅक क्वीन.'