Hungama 2 च्या सेटवर शिल्पा शेट्टी दिसली ज्येष्ठ अभिनेत्री हेलन सारख्या रेट्रो लूक मध्ये, Watch Video
Shilpa Shetty Video (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेला बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे तिचे चाहते तिची पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून लवकरच ती आपल्याला 'हंगामा 2' मध्ये दिसणार आहे. नुकताच तिने 'हंगामा 2' (Hungama 2) च्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती रेट्रो लूक मध्ये दिसत आहे. आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलनजीं सारखा डान्स करताना दिसत आहे. शिल्पा शेट्टी हेलनजींच्या अंदाजात चांगला डान्स करताना दिसत आहे. 4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

शिल्पा शेट्टीने रेट्रो अंदाजातील हा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टखाली तिने, आपण हंगामा 2 च्या सेटवर असून आपण येथे कोविड टेस्ट केली आहे. असे लिहिले आहे.हेदेखील वाचा- Shilpa Shetty आपली बहिण Shamita सह थिरकली दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांच्या 'या' सदाबहार गाण्यावर, Watch Video

या चित्रपटात शिल्पा शेट्टी सह प्रणिता सुभाष, परेश रावल, मीजन जाफरी दिसणार आहे. परेश रावल व्यतिरिक्त हंगामाचा दुस-या पार्ट मध्ये नवीन स्टारकास्ट दिसणार आहे सर्व प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

अलीकडेच शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिची बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty). हिचा शम्मी कपूरच्या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या योगाचे व्हिडिओ, मजेशीर व्हिडिओ तसेच आपल्या रेसिपीजचे व्हिडिओ देखील ती टाकत असते. दरम्यान मकर संक्रांती निमित्त देखील बहिण शमितासोबत मराठमोळ्या अंदाजात सर्वांना या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला.