अभिनेत्री शर्लिन चोप्रा कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. कधी तिची बोल्ड अदाकारी तर कधी तिचे सुपर हॉट फोटो. आता मात्र ती चर्चेत आली आहे ते तिच्या नव्या घरामुळे. शर्लिन चोप्रा ने तिचं नवं घर घेतलं आहे जगातील सर्वात उंच इमारतींच्या यादीतील एका इमारतीत.
दुबईतील बुर्ज खलिफा ही एक जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे. त्यावरून संपूर्ण दुबई पाहावं यासाठी अनेक लोक तिकीट खरेदी करून जातात. आणि जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्तीला बुर्ज खलिफासारख्या इमारतीत आपलं घर असावं असं नेहमी वाटतं. अशातच शर्लिनने आपलं नवं घर या इमारतीत घेतलं आहे. शर्लिनने नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वत: लाच बुर्ज खलिफामध्ये एक सुंदर अपार्टमेंट गिफ्ट केले आहे.
तिने नुकतंच आपल्या सोशल मीडिया हॅण्डल्सवर एक पोस्ट करत या बद्दल आपल्या फॅन्सना सांगितले आहे. विशेष म्हणजे शर्लिनचं हे नवं घर सर्व सुविधांसह अतिशय भव्य आणि सुंदर आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत शर्लिन आपल्या घराविषयी सांगताना म्हणाली, “दुबईत राहणाऱ्या माझ्या एका मित्राने मला दुबईत बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. आणि माझं ही एक स्वप्न होतं की मी जिथे नेहमी जाते तिथे माझं स्वत:चं घर असावं. दुबई माझ्या सर्वात आवडीचं शहर आहे."
काही वेबसाईट ने दिलेल्या माहितीनुसार बुर्ज खिलामध्ये 2 BHK घराची किंमत जवळपास 15 कोटी रुपये असते. मात्र शर्लिनने तिच्या घराची किंमत अद्याप सांगितलेली नाही.