Shahrukh Khan Smoking Viral Video: कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) या मोसमाची विजयाने सुरुवात केली आहे. शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात यजमान संघाने रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. या सामन्यात आंद्रे रसेलने 25 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली. विशेष म्हणजे शनिवारी शाहरुख खान आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचला होता. केकेआरच्या चाहत्यांसाठी शाहरुख खानला पाहणे हा एक आनंदाचा क्षण होता.
शाहरुख खानचा धूम्रपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल -
दरम्यान, शाहरुख खान (Shahrukh Khan) व्हीआयपी बॉक्समधून सामना पाहत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सिगारेट ओढताना दिसत (Shahrukh Khan Smoking Viral Video) आहे. शाहरुख खानला अशा प्रकारे स्मोकिंग करताना पाहून क्रिकेट चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. (हेही वाचा -Swatantrya Veer Savarkar: स्वतंत्र वीर सावरकर मधील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक आला समोर, पाहा पोस्टर)
पहा व्हिडिओ -
#ShahRukhKhan is smoking in the stadium and Hakla is an inspiration (Irony) 🤮 pic.twitter.com/MqukSRF9AY
— Prince (@purohit_pr78001) March 23, 2024
केकेआरने एसआरएचला 209 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात हैदराबाद संघाला 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 204 धावा करता आल्या.
रसेलने खेळली तुफानी खेळी -
या सामन्यात आंद्रे रसेलने खेळलेल्या 25 चेंडूत 64 धावांच्या तुफान खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 गडी गमावून 208 धावा केल्या. रसेलशिवाय फिल सॉल्टने 54 धावांची दमदार खेळी केली. तर रिंकू सिंगने 23 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत टी नटराजनने हैदराबादकडून तीन बळी घेतले.