Coronavirus च्या दहशतीमुळे शाहिद कपूर याच्या Jersey सिनेमाचे शूटिंग स्थगित; शाहिदची खास पोस्ट
Shahid Kapoor (Photo Credits: Instagram, Twitter)

देशासह राज्यात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे अनेक राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स यांच्यासह शाळा, कॉलेजस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय यांच्यावरही कोरोना व्हायरसचे सावट आहे. याचा परिणाम निश्चितच सिनेसृष्टीवरही झाला आहे. अनेक सिनेमांबरोबरच शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्या 'जर्सी' (Jersey) सिनेमाचे शूटिंगही थांबवण्यात आले आहे. याची माहिती शाहिद कपूरने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

कोरोना व्हायरस पसरु नये म्हणून आपल्या परीने शक्य तितके प्रयत्न करणे ही आपली सामाजिक जबाबादारी आहे. त्यामुळेच जर्सी सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. यामुळे जर्सी टीममधील सदस्यांना आपल्या कुटुंबियांसोबत घरी सुरक्षित राहता येईल. जबाबदार रहा. सुरक्षित रहा, अशा आशयाची पोस्ट शाहिदने केली आहे.

शाहिद कपूर ट्विट:

तेलुगू सिनेमाचा रिमेक असलेल्या 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी शाहिदने टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याच्याकडून ट्रेनिंग घेतले आहे. यापूर्वी सेटवर क्रिकेटचा सराव करताना शाहिद जखमी झाला होता. त्यामुळे शूटिंगही रद्द आले होते.

यापूर्वी कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे सलमान खान याच्या 'राधे' सिनेमाचा परदेश दौरा रद्द करण्यात आला होता. तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले. तसंच 'सूर्यवंशी' सिनेमाचे प्रदर्शनही लांबवण्यात आले आहे.