Shahid Kapoor Video: शाहिद कपूर याने सोशल मीडियावर शेअर केला फनी व्हिडिओ; तुम्ही पाहिलात का?
Shahid Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव्ह आहे. त्याचे सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग देखील चांगले आहे. सोशल मीडियावर आपले फोटोज आणि व्हिडिओज शेअर करुन तो चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्येही त्याच्या फनी डान्स व्हिडिओजनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. अलिकडेच शाहिद कपूर याने एक फनी व्हिडिओ (Funny Video) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल. व्हिडिओत शाहिद मजेशीर हावभाव करताना दिसत आहे. शाहिदचा हा फनी अंदाज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

शाहिदने हा फनी व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. केवळ हाय असे कॅप्शन देत शाहिदने हा व्हिडिओ पोस्ट केला. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड हिट ठरत आहे. शाहिदच्या या फनी व्हिडिओ 25 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर यावर चाहत्यांकडून कमेंट्चा वर्षाव होत आहे. शाहिदच्या या व्हिडिओवर भाऊ ईशान खट्टर याने कमेंट करत लिहिले, कोणत्या सिनेमाची तयारी चालू आहे?

पहा फनी व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Hi.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिद कपूर लवकरच गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित जर्सी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तसंच अभिनेत्री दिशा पटानी सोबत योद्धा सिनेमातही शाहिद कपूर झळकणार असल्याची माहिती अलिकडेच समोर आली होती. या सिनेमात शाहिद कपूर आणि दिशा पटानी सोबत संजय दत्त देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत देखील सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरील Ask Me Anything फिचरद्वारे तिला एक प्रश्न विचारण्यात आला. तिसऱ्या बाळाचे प्लॅनिंग करत आहात का? या चाहत्याकडू आलेल्या प्रश्नावर 'हम दो हमारे दो' असे उत्तर दिले होते.