Coronavirus मुळे घरी राहून कंटाळलेल्या शाहिद कपूर याने डान्स करत केला 'टाईमपास', Watch Viral video
Shahid Kapoor (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस चा परिणाम संपूर्ण जगभरात झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लोकांनी घराबाहेर न जाणे पसंत केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने ही सार्वजनिक ठिकाणे काही काळासाठी बंद ठेवले आहेत.याच पार्श्वभूमीवर सिनेकलाकारांचे शूटिंगही पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांनीही घरात राहणे पसंत केले आहे. मात्र सतत कामाची सवय असलेले काही बॉलिवूडकर आपापल्या परीने घरात विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात शाहिद कपूर (Shahid Kapoor) आपल्या घराच्या गार्डन परिसरात आपल्याच चित्रपटातील गाण्यावर नाचत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये शाहिद आपल्या 'बत्ती गुल मीटर चालू' या चित्रपटातील When You Getting Gold या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- Coronavirus मुळे घरात राहिलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण ने केले एका उत्तम गृहिणीला शोभेल असे काम

हा व्हिडिओ viralbhayani ने शेअर केला असून त्या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक लोकांनी शेअर केला आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ही आपण घरात राहून आपले Wardrobe नीट लावत आहोत या संदर्भातला एक फोटो शेअर केला होता. हा फोटो देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.