Coronavirus मुळे घरात राहिलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण ने केले एका उत्तम गृहिणीला शोभेल असे काम
दिपिका पादुकोणने आपले Wardrobe स्वच्छ करुन त्यातील कपडे नीट लावण्याचे काम करताना दिसत आहे. यात तिने आपले अनेक कपडे बेड वर पसरवून ठेवलेले दिसत आहे.
Covid-19 चा फटका सामान्य नागरिकांसह सिनेस्टार्सला देखील बसला आहे. बॉलिवूड अभिनेत्यांनी आपले चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले आहे. तर सलमान खान, ऋतिक रोशन यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी आपले परदेशी आयोजित करण्यात आलेले शो रद्द केले आहेत. शूटिंगची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे अनेक कलाकार घरी सुट्टीचा आनंद घेत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री तसेच बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने एका वेगळ्या अंदाजात हा आनंद घेताना दिसत आहे. नुकताच तिने याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका उत्तम गृहिणीला शोभेल असे काम करताना दिसत आहे.
दिपिका पादुकोणने आपले Wardrobe स्वच्छ करुन त्यातील कपडे नीट लावण्याचे काम करताना दिसत आहे. यात तिने आपले अनेक कपडे बेड वर पसरवून ठेवलेले दिसत आहे.
पाहा फोटो:
हेदेखील वाचा- 'मी त्याला Cheat करताना रंगेहाथ पकडलं' दीपिका पादुकोण हिचा पूर्व रिलेशनशिप बाबत मोठा खुलासा
या फोटोला दिपिकाने कॅप्शनही दिले आहे. ज्यात ती म्हणतेय की, कोविड-19 मुळे घरात असल्या कारणाने काहीतरी चांगले काम करण्याचा मी चंग बांधल्याचे तिने म्हटले आहे.
हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी देखील तिची प्रशंसा केली आहे. तसेच तिचा पती रणवीर सिंह ने देखील या फोटोला लाइक केले आहे. नेहमी शूटिंगमध्ये व्यस्त असलेली दीपिका घरातही तितकीच सक्रिय असते असे तरी या फोटोवरुन दिसत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2020 09:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

