अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुप्रतिक्षीत आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला चित्रपट 'पठाण' (Pathaan Full Movie आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला. तिकीटबारीवरुन येत असलेली आकडेवारी पाहता पहिल्याच दिवशी चित्रपट चांगलाच गल्ला जमवतो आहे. पण, जवळपास सर्वच प्रमुख चित्रपटांना जी भीती असते तीच 'पठाण' सिनेमाबाबत खरी ठरल्याची चर्चा आहे. 'पठाण' मूव्ही लिक (Pathaan Full Movie in HD Leaked on Torrent Sites & Telegram) झाला आहे. 'पठाण' लीक होण्याचा तिकीटबारीवर मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'पठाण' सिनेमा टेलीग्रामवर लिक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पठाण सिनेमाची लिंक इंटरनेटवरही आल्याची चर्चा आहे. पठाम सिनेमा सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा. कोणीही इंटरनेट अथवा इतर बनावट प्रकारे आलेल्या माध्यमातून हा चित्रपट पाहून नये, असे अवाहन पठाणच्या टीमने प्रेक्षक आणि चाहत्यांना केले होते. (हेही वाचा, Pathaan Release: बॉलिवूडच्या बादशाहचं धमाकेदार कमबॅक! पहिल्याचं दिवशी पठाणने जमवला ५० कोटींचा गल्ला)
दरम्यान, चित्रपटातील कोणतीही दृश्ये चित्रपटगृहांमधून चित्रित करून प्रसारित करू नयेत, असे पठाण टीमने म्हटले होते. तसेच, यशराज फिल्म्सने माहिती देताना म्हटले होते की, पठाण सिनेमाची कोणी फेक अवृत्ती काढली तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, तुम्हाला बनावट आवृत्ती प्रसारित होत असल्याचे लक्षात आले तर तुम्ही आम्हाला कळवावे. दरम्यान, सर्वतोपरी काळजी घेऊनही चित्रपट लिक झाल्याचेच बोलले जात आहे.
'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. याआधी, तो 2018 मध्ये 'झिरो' चित्रपटात दिसला होता. जो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. यानंतर, शाहरुख खानने ब्रेक घेतला आणि प्रदीर्घ काळानंतर त्याने पुनरागमन केले आहे. पठाण चित्रपटातील शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. समिक्षकांनी या चित्रपटाला गौरवले असून, लेटेस्टलीने या चित्रपटाला 3.5 स्टार दिले आहेत.