Aryan Khan प्रकरणानंतर Shah Rukh Khan ने सोशल मीडियावर केली पहिली पोस्ट, चाहते म्हणाले 'King is Back'
Shah Rukh Khan (PC - PTI)

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) गेल्या वर्षाचे शेवटचे महिने खूप कठीण गेले. ऑक्टोबरमध्ये त्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर आर्यनला जवळपास महिनाभर तुरुंगात दिवस काढावे लागले. शाहरुखने मुलाच्या जामिनासाठी धाव घेतली. अखेर आर्यन 30 ऑक्टोबरला तुरुंगातून बाहेर आला. या कठीण काळात शाहरुखने आपल्या कामातून आणि सोशल मीडियातून ब्रेक घेतला. प्रकरणापूर्वी त्यांनी शेवटची पोस्ट 19 सप्टेंबर 2021 रोजी केली होती. आता तीन महिन्यांनंतर किंग खानने सोशल मीडियावर पुनरागमन केले आहे. आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरूखने त्याची पहिली पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

शाहरुखने एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केला आहे. शाहरुखची ही प्रमोशनल पोस्ट असली तरी त्याच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शाहरुखचे चाहते अनेक दिवसांपासून त्याच्या सोशल मीडिया पोस्टची वाट पाहत होते, जी आज पूर्ण झाली आहे. (वाचा - Shamshera Release on OTT: रणबीर कपूर-संजय दत्तचा 'शमशेरा' ओटीटी वर होणार रिलीज)

या व्हिडिओमध्ये शाहरुखची स्क्रिप्ट बरंच काही सांगून जाते. या जाहिरातीद्वारे त्यांनी स्वतःचे आणि इतरांचे यश सांगितले आहे. यशासारखी दुसरी गोष्ट नाही...तुमचे यश तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत दिसून येते, तुम्ही प्रकाशापेक्षा उजळ आहात, आयुष्यापेक्षा अधिक रंगीत आहात. तुम्ही जिंकता, तुम्ही तुमच्या जगावर राज्य करता. तुमच्यासारखा कोणी नाही...'

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

सोशल मीडियावर शाहरुखचे पुनरागमन पाहून त्याचे चाहते खूश झाले आहेत. एका यूजरने 'किंग इज बॅक' असे लिहिले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, 'शेवटी SRK सोशल मीडियावर परत आला.' एकाने 'वेलकम बॅक मास्टर' असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर शाहरुखच्या पुनरागमनाचे जवळपास सर्वच युजर्सनी मनापासून स्वागत केले आहे.