इम्रान हाश्मीचे डिजिटल विश्वात पदार्पण; शाहरुख खान निर्मित 'Bard of Blood' मध्ये मुख्य भूमिकेत!
Shah Rukh Khan and Emraan Hashmi | (Photo Credits- YouTube)

सध्या डिजिटल विश्वात वेब सीरीजची धूम आहे. आणि याची हवा आता बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला सुद्धा लागली आहे. नेटफ्लिक्सवर शाहरुखची रेड चिलीज इंटरटेन्मेंट ‘Bard of Blood’ नावाच्या वेब सीरीजची निर्मिती करणार असून त्यात दस्तुरखुद इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत असणार आहे. या सीरीजची शूटिंग सुद्धा लेह मध्ये  सुरु झाली आहे. ‘नेटफ्लिक्स’ची ही तिसरी वेब सीरीज आहे.

 

इम्रान सोबत किर्ती कुल्हारी आणि विनीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.  रेड चिलीज इंटरटेन्मेंटचे गौरव वर्मा यांनी ट्विटरवर ह्याची माहिती दिली. ही वेब सीरिज बिलाल सिद्दीकी यांच्या ‘द बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित असून, या बहुभाषिक सीरिजमध्ये कबीर आनंद नावाच्या बहिष्कृत गुप्तचराची कथा साकारण्यात येणार आहे.

शाहरुख खानने गौरव वर्मा यांचे ट्विट रिट्विट केले

सेक्रेड गेम्सच्या तुफान यशानंतर ‘Bard of Blood’ लोकांच्या किती पसंतीत उतरते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मराठमोळ्या जितेंद्र जोशीची सेक्रेड गेम्स मध्ये मुख्य भूमिका होती. नेटीझेंसनी ही मालिका खूप लोकप्रिय केली होती. लवकरच या मालिकेचा दुसरा पर्व येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्या आधी ‘Bard of Blood’ किती लोकप्रिय ठरते हे बघू.