23Years of DDLJ : ‘राज-सिमरन’ जोडीने मराठा मंदिरमध्ये रचला विक्रम, 1200 आठवडे पूर्ण करणारा पहिला बॉलिवूड सिनेमा
दिलवाले दुल्हनिया ले जायेगे Photo Credits: Twitter

19 ऑक्टोबर 1995 साली प्रदर्शित झालेला दिलवाले दुल्हनिया ले जायेगे या सिनेमाने यंदा 23 वर्ष पूर्ण केली आहेत. या सिनेमाची जादू आजही कायम आहे. केवळ रसिकांच्या मनातच नव्हे तर थिएटरमध्येही आज नियमित या सिनेमाचे शो ठेवले आहेत. बॉलिवूडमध्ये 1200 आठवड्याहून अधिक दिवस चालणारा हा पहिला आणि एकमेव सिनेमा ठरला आहे.

राज आणि सिमरनची युरोपातून सुरू झालेली लव्हस्टोरी भारतापर्यंत पोहचते. या सिनेमातून शाहरूख आणि काजोल ही जोडी तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनली. काजोल आणि शाहरूख प्रमाणे अमरीश पुरी, फरीदा जलाल, मंदिरा बेदी, परमीत सेठी आणि सतीश शाह या कलाकारांच्या भूमिकाही विशेष लक्षात राहतात. 23 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या ओठांवर या चित्रपटातील गाणी आहेत. गेली 23वर्ष रसिकांकडून या चित्रपटाला मिळणारी दाद अभुतपूर्व आहे.

 

काजोल आणि शाहरूखने ट्विटरच्या माध्यमातून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरूख आणि काजोल या जोडीच्या कुछ कुछ होता है या सिनेमाने 20 वर्ष पूर्ण केल्याने खास सेलिब्रेशन ठेवण्यात आले होते.