सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजम (Nepotism) हा वाद अगदी चव्हाट्यावर आला आहे. यामुळे सध्या सुशांतच्या चाहत्यांमध्ये रोष जाणवत असून एक प्रकारची क्रांतीची लहर सर्वत्र दिसत आहे. या प्रकरणात अनेक कलाकार, गायकांनी देखील भाष्य केले असून आता ज्येष्ठ गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांनी घराणेशाहीवर टिकास्त्र सोडले आहे. सुशांत सिंह आपल्यात नाही यावर माझा अजून विश्वासच बसत नाही. मात्र त्याच्या जाण्याने देशात एक वेगळीच क्रांती दिसत आहे, ज्याच्या फायदा पुढच्या पिढीला होऊन अनेकांना बॉलिवूडमध्ये काम मिळेल.
कुमार सानू म्हणाले, "सुशांतने आत्महत्या केली यावर माझा अजून विश्वास बसत नाही आहे. आतापर्यंत त्याच्याबद्दल जेवढं ऐकलं त्यावरून कळतं की तो एक सकारात्मक विचारांचा व्यक्ती होता. हुशार आणि आपल्या दमदार अभिनयाने त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. बिहारमधून असे अनेक दमदार कलाकार आले आहेत ज्यात मनोज वाजपेयी, शेखर सुमन, उदित नारायण सारख्यांचा दिग्गजांचा समावेश आहे." करण जौहर, आलिया भट्ट आणि करिना कपूर यांनी ट्रोलर्सला कंटाळून घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!
"सुशांत माझ्या मुलासारखा आहे. खूप कमी वयात त्याने यश मिळवले होते. देव त्याच्या आत्म्यास शांति देवो. मनात विचार येतो सुशांतने आत्महत्येचे पाऊनल उचलायला पाहिजे नव्हते. मात्र त्याच्या निधनाने बॉलिवूडमधील नेपोटिजम समोर येत आहे, यामुळे कदाचित येणा-या पिढीला बॉलिवूडमध्ये चांगले काम मिळेल." असेही कुमार सानू म्हणाले.
14 जूनला वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येने सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. सुशांत सिंह याने अनेक चित्रपटात अप्रतिम कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर सुशांतचा दिल बेचारा (Dil Bechara) हा चित्रपट 8 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, देशात कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा दिल बेचारा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करावे, अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी निर्मात्यांकडे केली आहे.