Salman Khan च्या मागील संकटांचा ससेमिरा काही संपेना, ज्येष्ठ पत्रकाराने केली सलमान विरोधात दाखल केली तक्रार, पाहा नेमकं झाले काय?
Salman Khan (Photo Credits: WIki Commons)

बॉलिवूड दबंग सलमान खान (Salman Khan) च्या विरोधात 25 जूनला एका पत्रकाराने तक्रार दाखल केली आहे. अशोक पांडे (Ashok Pande) असे या ज्येष्ठ पत्रकाराचे नाव असून त्याने असा आरोप केला आहे की, एप्रिल महिन्यात एक घटनेत सलमान ने त्यांच्या हातातून त्यांचा फोन हिसकावून घेतला होता. मुंबई च्या अंधेरी मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट कोर्टात केस दाखल केली आहे. अशोक पांडे यांचे वकिल गुप्ता आणि निशा अरोड़ा यांनी अशी माहिती दिली आहे की, IPC च्या 323, 392, 426, 506 आणि 34 या कलमांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात अशोक पांडे ने सलमान खान वरती असा आरोप लावला होता की, जेव्हा तो मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवत होता तेव्हा त्याला शूट करत असताना सलमानने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला होता. मात्र तेव्हा त्यांनी त्याच्या बॉडीगार्डची परवानगी घेऊन त्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली. कदाचित सलमान ला ही गोष्ट आवडली नाही आणि त्यावेळी सलमान आणि अशोक पांडे यांच्यात बरीच बाचाबाची झाली.

हेही वाचा- BIGG BOSS 13 : बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी Salman Khan किती पैसे घेणार? रक्कम घ्या जाणून

एवढच नव्हे तर त्यावेळी सलमान खानच्या बॉडीगार्डनेही अशोक पांडें च्या कॅमेरामन शी सुद्धा गैरवर्तणूक केली होती. 12 जुलै ला या खटल्याची सुनावणी होणार आहे.

सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सलमान खानचा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला 'भारत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. हा चित्रपट साउथ कोरियन चित्रपट 'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा रिमेक आहे.