Paresh Rawal (Photo Credits: Facebook and ANI)

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र काही भागात निर्बंध शिथिल करण्यात आले असून यासाठी भारत सरकाराने विशेष नियमावली बनवली आहे. यानुसार आजपासून देशात वाईन शॉप सुरु झाले. त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून चातकाप्रमाणे वाट पाहत असलेल्या तळीरामांनी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत वाईन शॉप बाहेर लांबच लांब रांगा लावल्या. आज सकाळपासून देशात अनेक भागात मुंबई सह देशातील अनेक भागात हे चित्र पाहायला मिळाले. हे चित्र पाहून ज्येष्ठ अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) यांनी या तळीरामांना एक मजेशीर सल्ला देत ट्विट केले आहे.

लॉकडाऊन मुळे वाईन शॉपची दुकाने बंद झाल्याने मद्यप्रेमींची निराशा झाली होती. मात्र आजपासून वाईन शॉप सुरु होणार ही बातमी मिळताच दुकाने उघडण्याआधीच पहाटेपासूनच वाईन शॉप बाहेर रांगा लावल्या. Lockdown: दारूसाठी दुकांनासमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा: दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्रात तळीरामांच्या लांबच लांब रांगा; Watch Video

पाहा यावर परेश रावल यांचा मजेशीर सल्ला

दारू प्यायल्यानंतर सरळ आपल्या घरी जा, नाहीतर उगाच चीनसोबत लढायला जाल, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन हा आकडा आता 42,836 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 11,762 रुग्ण बरे झाले असून 1389 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 2573 नवे रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.