Harshvardhan Rane Tested Positive for COVID-19: प्रसिद्ध तेलगू अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) ला कोरोना विषाणूची (COVID-19) लागण झाल्याचे आढळले आहे. हर्षवर्धनला आपल्याला चाहत्यांना एक चांगली बातमी द्यायची होती. मात्र, यादरम्यान, त्याला कोरोना विषाणूची लागण झाली. कोरोनामुळे हर्षवर्धनला पुढील 10 क्वारंटाईन राहावं लागणार आहे.
हर्षवर्धन राणेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्याने म्हटलं आहे की, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला ताप आणि पोटाचा त्रास होत होता. त्यामुळे मी रुग्णालयात गेलो. परंतु, माझे फुफ्फुस निरोगी असून हा व्हायरल ताप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मला कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नव्हती. मात्र, तरीदेखील मी कोरोना चाचणी करून घेतली आणि माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले. त्यामुळे आता मला दहा दिवस अलिप्त रहावे लागणार आहे. माझ्याकडे एक चांगली बातमी होती. परंतु, आता तुम्हाला त्यासाठी आणखी 10 दिवस थांबावं लागणार आहे. लवकरच एका चांगल्या बातमीसह आणि चांगल्या आरोग्यासह भेटू,' असंही हर्षवर्धनने म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसचा Theatre Chain ला फटका; Cineworld, Picturehouse व Regal सिनेमाज होणार तात्पुरते बंद; 45,000 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात)
Tested Corona Positive pic.twitter.com/nlXa7IAc3w
— Harshvardhan Rane (@harsha_actor) October 5, 2020
हर्षवर्धनने शेवटी, आपल्या मजेदार शैलीत लिहिलं आहे की, "कृपया काळजी करू नका, कृपया मला व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी कडून प्रिस्क्रिप्शन पाठवू नका. फक्त आपले प्रेम पाठवा." हर्षवर्धन राणेने अनेक तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2016 मध्ये त्याने 'सनम तेरी कसम' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता.