अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वाद हे नाते काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत या सलमानचे नाव अनेक वादांशी जोडले गेले आहे. अलीकडेच सलमान खानचा शेजारी केतन कक्करने (Ketan Kakkar) त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सलमान खानही शेजाऱ्याला उत्तर देताना दिसला. प्रतिमा खराब केल्याबद्दल सलमानने त्याच्या शेजाऱ्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. सध्या तरी सलमान खानला या प्रकरणात दिलासा मिळताना दिसत नाही. ताज्या माहितीनुसार, केतन कक्कर यांच्याकडे असलेले पुरावे बरोबर असल्याचे मुंबई न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
केतनने यूट्यूबवर केला होता खुलासा
केतन कक्कर एक एनआरआय आहे आणि त्याचे घर सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसच्या शेजारी आहे. केतनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सलमान खानवर निशाणा साधला होता. त्याने सलमान खानच्या फार्महाऊसबद्दल अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यावर कोणाचाही विश्वास बसणे कठीण होते.
सलमानच्या वकिलांनी मांडली बाजु
याप्रकरणी सलमान खानचे वकील प्रदीप गांधी यांची बाजूही समोर आली आहे. सलमानच्या वकिलाचे म्हणणे आहे की केतन कक्करने सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी जमीन घेण्याचा प्रयत्न केला होता. जमिनीचे व्यवहार बेकायदेशीर असल्याने वारंवार रद्द करण्यात आले. या प्रकरणानंतर केतन कक्करने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. (हे देखील वाचा: Mission Cinderella: अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंह यांचा 'मिशन सिंड्रेला' 'या' दिवशी होणार OTT वर प्रदर्शित)
केतन कक्कर यांची बाजू
केतन कक्करच्या वकिलाने स्पष्ट केले आहे की, केतनला निवृत्तीनंतर इथेच राहायचे होते. त्यांनी 1996 साली जमीन घेतली होती. वकिलाचा दावा आहे की, गेल्या 7-8 वर्षांपासून सलमान आणि त्याचे कुटुंबीय केतनच्या जमिनीवर आपला हक्क सांगत आहेत.