Salman Khan चा 'अंतिम: द फाइनल ट्रुथ ' मधील लूक व्हायरल, शूटिंग सेटवरील फोटोज आले समोर
Salman Khan in Antim Look (Photo Credits: Instagram)

मराठीमध्ये तुफान गाजलेला 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक येत आहे. 'अंतिम: द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) झळकणार आहे. यामध्ये तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान या चित्रपटातील सलमान खानच्या लूकचे अनेक फोटो याआधी व्हायरल झाले होते. आता काही शूटिंग सेटवरील फोटोज सोशल मिडियावर व्हायरल (Viral Photos) होत आहे.

डोक्यात पगडी घातलेल्या सरदारजीच्या वेशात सलमान खान या फोटोजमध्ये दिसत आहे. सलमानने यात काळ्या रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. तसेच डोक्यावर लाल रंगाची पगडी घातली आहे. त्याच्या हातात कॉफी मग दिसत आहे. हा फोटो शेअर करत शेराने “थ्रोबैक फ्राइडे #SalmanKhan #Sheraa #Beingsheraa #Antim” असे हॅशटॅग कॅप्शनला दिले आहे.हेदेखील वाचा- Salman Khan Shoots for Antim: 'अंतिम' चित्रपटाच्या सेटवरून लीक झाले सलमान खानचे 'हे' फोटो; पहा खास छायाचित्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Being Sheraa (@beingshera)

'अंतिम' या चित्रपटात सलमानचा मेहूणा आयुष शर्मासुद्धा मुख्य भूमिकेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

तो या चित्रपटात गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. या महिन्यात ‘अंतिम’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सलमान ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

दरम्यान येत्या 13 मे ला 'राधे: युअर मोस्ट वॉटेंट भाई' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी झळकणार आहे. हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.