सलमान - कॅटरीनाच्या 'स्वॅग से स्वागत'चा युट्युबवर नवा विक्रम
स्वॅग से स्वागत Photo credits : YouTube

एक था टायगर या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'टायगर जिंदा है' या सिनेमानेही बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. डिसेंबर 2017 मध्ये रीलिज झालेल्या या सिनेमाच्या गाण्याने युट्युबवर नवा विक्रम रचला आहे. त्यामुळे कलाकारांसोबतच सलमान - कॅटरीनाच्या फॅन्समध्येही आनंदाचं वातावरण आहे.

'स्वॅग से स्वागत' सुपर हीट

टायगर जिंदा है या चित्रपटाच्या रीलिज दरम्यान 'स्वॅग से स्वागत' हे गाणं पहिल्यांदा लॉन्च करण्यात आलं. या गाण्यामध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफसोबतच जगभरातील अनेक कलाकारांचा जलवा पहायला मिळतो. युट्युबवर 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत' या गाण्याने मागील सहा महिन्यात 600 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळवण्याच्या टप्पा पार केला आहे. असा विक्रम करणारा 'टायगर जिंदा है' हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. या गाण्याला भारतात सर्वाधिक व्ह्युजचा मान मिळाला आहे.

सलमान कॅटचा हटके अंदाज

स्वॅग से स्वागत हे गाणं चित्रपटाच्या सर्वात शेवटी आहे. त्यामध्ये जगभरातील अनेक कलाकारांना एकत्र घेऊन हे गाणं बांधलं आहे. अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना या गाण्यावर एकदम कूल अंदाजात थिरकले आहेत. संगीतकार विशाल- शेखर यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. तर इरशाद कामिलने हे गाणं लिहलं आहे. कोरिओग्राफर वैभवी मर्चंटने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.