'Dabangg 3' मध्ये खलनायक असलेल्या किच्चा सुदीप ला सलमान खानने हे दिली 2 कोटीची कार; हे आहे यामागचे कारण
Sudeep (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा दबंग खान किती दिलदार आहे हे सर्वांनाच माहित आहे. अगदी सेलिब्रिटींपासून गोरगरिबांच्या मदतीसाठी तो नेहमीच धावून येतो. तसेच सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) अनेकांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन दिले त्यातील अनेकांचे आज नशीब फळफळले आहे. असा हा दिलदार दबंग खान कधी काय करेल याचा नेम नाही. संकटांमध्ये अनेकांच्या मदतीला धावून जाणारा सलमान एखादा व्यक्ती त्याला आवडला तरी त्याच्या स्तुतीस्वरुप त्या व्यक्तीला काही भेट देतो. असेच काहीसे घडलय 'दबंग 3' (Dabangg 3) च्या खलनायकाच्या बाबतीत. या चित्रपटातील खलनायक साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीपला (Sudeep) त्याच्या कामावर खूश होऊन चक्क 2 कोटी ची कार गिफ्ट म्हणून दिली आहे.

सलमानने आपल्याला असे काही गिफ्ट देईल यावर किच्चा चा विश्वासच बसत नाहीय. सलमानने आपल्या कामाची पावती म्हणून दिलेली ही भेटवस्तू पाहून तो खूपच भारावून गेला आहे. त्याने इन्स्टावर सलमान आणि त्याने दिलेल्या कारचे नवीन फोटो शेअर केले आहे. सलमान खान साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीपच्या घरी गेला असता किच्चा ला त्याने नवीन बीएमडब्ल्यू एम 5 कार गिफ्ट केली आहे.

पाहा फोटो

हेदेखील वाचा- 'दबंग 3' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिस कमावला 24 कोटींचा गल्ला

त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जेव्हा आपण चांगलं करतो तेव्हा नेहमीच चांगलं होतं. सलमान खान सरांनी पुन्हा एकदा माझ्य़ावर विश्वास टाकला आहे आणि मला हे विशेष गिफ्ट दिलं आहे. तुम्ही माझ्यावर आणि माझ्या कुटूंबियांबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि आपण माझ्या घरी आलात याचा मला आनंद झाला.'

सलमानचा हा दिलदार पण त्याच्या चाहत्यांसाठी काही नवीन नाही. याआधीही त्याने आपल्या चाहत्यांना त्याचे लकी ब्रेसलेट, घड्याळ भेटवस्तू म्हणून दिले आहे.