Salman Khan चा 'Antim' चित्रपटातील फर्स्ट लूक आला समोर, मेहुणा आयुष शर्मा ने शेअर केला 'हा' व्हिडिओ
Salman Khan Antim First Look (Photo Credits: Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याचा 'अंतिम' (Antim) चित्रपटातील फर्स्ट लूक (First Look) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमानचा लूक पाहून त्याचे चाहते हैराण होणार हे वेगळं सांगायची गरज नाही. हा व्हिडिओ सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माने (Aayush Sharma) आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून सर्वजण भाईजानच्या या लूकची चर्चा करत आहे. या व्हिडिओला चाहत्यांना लाइक केले असून अनेकांनी यावर कमेंट्स दिले आहेत.

या व्हिडिओमध्ये सलमान खान एका सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात तो पोलिसाची भूमिका बजावणार ही माहिती याआधीच मिळाली होती. डोळ्याला काळा चश्मा, निळ्या रंगांचे शर्ट आणि डोक्यावर पगडी अशा रुबाबात सलमान एका भाजीमंडई मध्ये जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.हेदेखील वाचा- बॉलिवूडचा भाईजान सलमान खान महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट 'अंतिम' साठी सज्ज, 15 नोव्हेंबरपासून होणार शूटिंगला सुरुवात

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

हा चित्रपट मराठी ब्लॉकब्लस्टर हिट ठरलेल्या 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक असेल. या चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटात ही भूमिका उपेंद्र लिमये याने केली होती. त्याचबरोबर सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा हा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

रिपोर्टनुसार, मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी 2018 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा सलमान खान आणि अरबाज खान यांच्यासाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवली होती. त्यावेळी त्या दोघांना हा चित्रपट खूप आवडला होता. त्यावरून त्यांना या चित्रपटाचा रिमेक बनवायचे ठरवले. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला करणार आहे.