Salman Khanच्या चाहत्यांना त्याच्या Birthday दिवशी 'या' Return Gifts ची अपेक्षा!
सलमान खान (Photo Credits: Instagram)

Salman Khan Birthday Special :  बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) येत्या 27 डिसेंबरला 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे. वर्षातले काही विशिष्ट दिवस त्याच्या चाहत्यांसाठी खास असतात. त्यापैकी एक दिवस म्हणजे सलमान खानचा बर्थ डे (Salman Khan Birthday)  ! एका उत्सवाप्रमाणे या दिवशी त्याच्या चाहत्यांमध्ये चैतन्य असतं. गॅलेक्सी (Galaxy Apartment)  या त्याच्या राहत्या घराच्या इमारतीबाहेर अनेक फॅन्स एकत्र येतात. यंदा या दिवसाचं औचित्य साधून सलमान एखादी मोठी घोषणा करू शकतो.

जगभरातील लाखो चाहत्यांना सलमान त्याच्या बर्थ डे चं एखादं रिटर्न गिफ्ट देणार आहे. सलमान खान त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी प्रोजेक्टची घोषणा करू शकतो. यामध्ये काय- काय असू शकतं त्याचे हे काही अंदाज -

  • सलमान खानचा 'दबंग' हा सिनेमा विशेष गाजला. त्याच्या सिक्वेललादेखील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दबंग 3 सिनेमाची वाट पाहणार्‍या त्याच्या चाहत्यांना तो वाढदिवसादिवशी एखादी मोठी बातमी देऊ शकतो. अरबाझ खानने या सिनेमची कथा लिहून पूर्ण झाली आहे. 2019 मध्ये या सिनेमाची घोषणा होऊ शकते असं म्हटलं होतं.
  • दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक दिवसांपासून सलमान खान आणि संजय लीला भंसाळी एकत्र काम करणार असल्याची चर्चा रंगत होती. आता अखेर हा योग खरंच जुळून आला आहे का? याचं उत्तर सलमान देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
  • सध्या सलमान खान 'भारत' सिनेमाच्या शुटिंगमध्ये आहे. या सिनेमाचं शुटिंग अंतिम टप्प्यात असून 2019 च्या ईदला हा सिनेमा रिलिज होणार आहे. त्यामुळे या सिनेमाची झलक रिटर्न गिफ्टच्या स्वरूपात मिळू शकते.

सलमान खान अनेकदा त्याचा वाढदिवस त्याच्या जवळच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबत नवी मुंबईतील त्याच्या फार्म हाऊसवर साजरा करतो. यंदा सलमानच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा कोणताच प्लॅन जाहीर करण्यात आला नाही.