Salman Khan याने भाची Ayat आणि परिवारासोबत साजरा केला 56 वा वाढदिवस, पहा Photo, Videos
Salman Khan 56th Birthday (Photo Credits-Instagram

Salman Khan's 56th Birthday Celebration: बॉलिवूडमध्ये भाईजान, दबंग म्हणून ओळख असणाऱ्या सलमान खान याचा आज 56 वा वाढदिवस आहे. तर याच खास क्षणी सलमान याने आपल्या परिवारासोबत त्याचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. चाहत्यांकडून सुद्धा आता सलमान खान याला वाढदिवासनिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत.(Actor Salman Khan on Snake Bite: मी आता ठीक आहे, सर्पदंशानंतर अभिनेता सलमान खान याची प्रतिक्रिया)

सलमान याने रविवारी रात्री आपल्या पनवेलच्या फार्महाउसवर आपली भाजी अयात शर्मा आणि परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा केला. याच वेळी सलमान याची आई आणि वडील सलीम खान सुद्धा तेथे उपस्थितीत होते.

दरम्यान, सलमान खान याला सापाने दंश केल्यानंतर त्याला 6 तास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला गेला. अभिनेता प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस फार्महाउसवर साजरा करताना दिसतो. तर यंदा सुद्धा तो तेथच आपल्या परिवारासोबत वाढदिवस साजरा करताना दिसून आला आहे.