सैफ अली खानने असा साजरा केला आपला नवाब तैमुरचा वाढदिवस; Paparazzi ना भरवला केक, Video Viral
तैमूरचा वाढदिवस

बॉलिवूड स्टार किड तैमूर अली खानचा (Taimur Ali Khan) आज वाढदिवस आहे. तैमूर आज आपला तिसरा वाढदिवस साजरा करीत आहे. गेल्या तीन वर्षांत तैमूरची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही, त्यामुळे यंदाही त्याच्या चाहत्यांमध्ये वाढदिवसाबद्दल उत्सुकता आहे. तैमूरला लोकप्रिय बनवण्यासाठी पापराझी (Paparazzi) म्हणजे फोटो पत्रकारांचा फार मोठा हात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तैमूरचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याचे काम हे पापराझी करत असतात्त. आता सैफ अली खानने नवाब तैमुरचा वाढदिवस या सर्व पापराझी लोकांसोबत साजरा केला आहे.

सध्या सोशल मिडीयावर या सेलेब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सैफ अली खान फोटो पत्रकारांना केक आणि खाद्यपदार्थ देताना दिसून येत आहे. सैफसोबत करीनाही यावेळी उपस्थित होती. हा केक खास या पत्रकारांसाठी मागवण्यात आला होता. यावेळी सैफ म्हणाला, ‘हा केक तैमूरकडून आहे, सर्वांनी खा आणि आनंद घ्या. इथे आल्याबद्दल धन्यवाद’ त्यानंतर पत्रकारांनीही मोठ्या आनंदात ‘Happy Birthday Taimur’ म्हणत तो केक कापला.

 

View this post on Instagram

 

HAPPY BIRTHDAY TIM!

A post shared by Kareena Kapoor Khan Fanclub. (@kareenafc) on

(हेही वाचा: Taimur Birthday Special: पाहा तैमूरचे आजवरचे सर्वात Cute फोटो)

Taimur Birthday Special: पाहा तैमूरचे आजवरचे सर्वात Cute फोटो Watch Video 

ऑक्टोबर 2012 मध्ये करीना आणि सैफचे लग्न झाले होते आणि 20 डिसेंबर 2016 रोजी तैमूरचा जन्म झाला. आजचा तैमूर अली खानचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबाने एकत्र साजरा केला. यावेळी करण जोहर आणि त्याची मुले, तसेच रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा आपल्या मुलांसोबत सहभागी झाले होते. आपल्या वाढदिवशी तैमूरने ख्रिसमस थीम केक कापला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.