'सेक्रेड गेम्स 2' च्या शूटिंगला सुरुवात ; सैफ अली खानचे फोटोज व्हायरल
सेक्रेड गेम्स (Photo Credits: Facebook)

विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' (2006) या कादंबरीवर आधारीत वेबसिरीजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. नेटफ्लिक्सवर प्रसारीत होणाऱ्या या वेब सिरीजमध्ये सैफ अली खान, राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. क्राईम थ्रिलर वेबसिरीज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली. आता या वेब सिरीजच्या दुसऱ्या पार्टची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहात आहेत आणि लवकरच या वेब सिरीजचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पार्टचे शूटिंग करतानाचे सैफ अली खानचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फॅनने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सैफ शीख पोलिस ऑफिसर सरताज सिंगची भूमिका साकारत आहे.

सेक्रेड गेम्सचे शूटिंग करताना सैफ अली खान. (Photo Credits: File Photo)

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीजनचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी एकत्रितपणे केले होते.