Sagar Pandey Passes Away: मुंबईत जिममध्ये व्यायाम करताना सागर पांडेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; 23 वर्षांपासून करत होता सलमानसोबत काम
Sagar Pandey, Salman Khan)

Sagar Pandey Passes Away: चित्रपटसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सलमान खान (Salman Khan)च्या बॉडी डबलची भूमिका करणाऱ्या सागर पांडे (Sagar Pandey) चे 30 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो जिममध्ये व्यायाम करत होता. बॉडीगार्ड या चित्रपटात तो सलमानच्या डुप्लिकेटच्या भूमिकेत होता. सागरला सागर सलमान पांडे या नावानेही ओळखले जात होते. गेल्या ऑगस्टमध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनाही जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. एम्समध्ये उपचारादरम्यान त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

गेली दोन वर्षे चित्रपटसृष्टीसाठी धक्कादायक ठरली आहेत. एकापाठोपाठ एक आकस्मिक मृत्यूच्या बातम्यांनी सगळेच घाबरले आहेत. दीपेश भान, राजू श्रीवास्तव यांच्यानंतर कलाकार सागर पांडे यांचेही आकस्मिक निधन झाले. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा डुप्लिकेट प्रशांत वाल्डे याने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. प्रशांतने सांगितले की, सागर जीममध्ये व्यायाम करत असताना अचानक तो कोसळला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - Adipurush Teaser Release Date: प्रभू श्रीरामाच्या भूमिकेने प्रभासने जिंकली प्रेक्षकांची मनं; चित्रपटाचा टीझर कधी आणि कुठे रिलीज होणार, जाणून घ्या)

प्रशांत म्हणाला, मला खूप धक्का बसला आहे. तो तंदुरुस्त आणि निरोगी होता. त्याचे वय 40 ते 50 च्या दरम्यान असावे. सागरने 'कुछ कुछ होता है' मध्ये सलमान खानची बॉडी डबल भूमिका केली होती. यानंतर त्याने बजरंगी भाईजान, ट्यूबलाइट, दबंग, दबंग 2, दबंग 3 यांसारख्या चित्रपटांमध्येही सलमानच्या बॉडी डबलची भूमिका साकारली होती.

यापूर्वीच्या एका मुलाखतीदरम्यान सागरने सांगितले होते की, लॉकडाऊन दरम्यान काम बंद झाल्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. सागरच्या कमाईचे मुख्य स्त्रोत अभिनय आणि स्टेज शो होते, परंतु लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपटांचे शूटिंग ठप्प झाले आणि कार्यक्रमही रद्द करण्यात आले. सागर सलमान खानसारखा बॅचलर आहे. सागरला 5 भाऊ असून त्यांचा खर्च सागर उचलत असे.