Sadak 2 ट्रेलरपाठोपाठ त्यातील नव्या गाण्याकडेही लोकांनी फिरविली पाठ; गाण्याला Likes पेक्षा जास्त 'Dislikes'
Sadak 2 Song (Photo Credits: YouTube)

महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित 'सडक 2' (Sadak 2) हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) प्रकरणी वादाच्या भोव-यात अडकलेले महेश भट (Mahesh Bhatt), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्वाधिक नापसंती दाखवून सुशांतच्या चाहत्यांनी आधीच या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. त्यात भर म्हणून नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटातील नवे 'दिल की पुरानी सडक' (Dil ki Purani Sadak) या गाण्यालाही सर्वाधिक डिसलाईक्स देत प्रेक्षकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या चित्रपटात संजय दत्त सह (Sanjay Dutt) आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) देखील प्रमुख भूमिकेत दिसतील.

सडक 2 या चित्रपटातील 'दिल की पुरानी सडक' या गाण्याचा व्हिडिओ आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मात्र या गाण्याला केवळ 10,000 लाईक्स मिळाले असून 30,000 डिसलाईक्स मिळाले आहेत. याचाच अर्थ या गाण्याला पसंती पेक्षा नापसंतीच जास्त मिळली आहे.

हेदेखील वाचा- Sadak 2 Most Disliked YouTube Video: आलिया भट्ट, संजय दत्त यांच्या 'सडक 2' च्या ट्रेलरचा नवा विक्रम; ठरला भारतामधील सर्वाधिक नापसंत व्हिडिओ, जाणून घ्या काय म्हणाली पूजा भट्ट  

दरम्यान या आधी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. 6 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळालेल्या या ट्रेलरला 12 लाखाहून अधिक लोकांनी डिसलाईक्स केले आहे.

महेश भट्ट दिग्दर्शित सडक 2 हा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला डिज्नी प्लस हॉट स्टारवर झळकणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र लोकांचा येणारा नकारात्मक प्रतिसाद पाहता हा चित्रपट कितपत यशस्वी होईल ते येणा-या काही दिवसांतच कळेल.