
गेल्या ब-याच दिवसांपासून चर्चेत असलेला साहो चित्रपट येत्या 30 ऑगस्टला अखेर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटातील अॅक्शन सीन्समुळे तसेच गाण्यांमुळे बराच चर्चेत येतोय. त्यातच या चित्रपटाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. 'बॅड बॉय' असे या गाण्याचे बोल असून प्रभाससोबत (Prabhas) जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.
हे गाणे खुद्द रॅपर बादशहा (Badshah) ने गायले असून नीती मोहन (Neeti Mohan) या गायिकेने यात त्याला साथ दिली आहे. इतकच नव्हे तर बादशहाच या गाण्याचा गीतकार आणि संगीतकार आहे.
'बॅड बॉय' गाणे:
साहो चित्रपटात अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे कलाकार मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे.
हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र अक्षय कुमार याच्या मिशन मंगल आणि जॉन अब्राहम याच्या बाटला हाऊस या सिनेमांची होणारी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी साहो सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलली.