Romeo Akbar Walter Trailer: भारतीय जवानांवर भाष्य करणारे बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत. तसेच 'सत्यमेव जयते' (Satyameva Jayate) या सुपरहिट चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याचा आगामी चित्रपट 'रॉ' (RAW) मधून झळकणार आहे. 'रॉ' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी (4 मार्च) रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. तर पुलवामा दहशतावदी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपट 'रॉ' याचा पूर्ण अर्थ 'R-रोमियो,A-अकबर, W-वॉल्टर' असा आहे. तर चित्रपटाची टॅगलाईन ही 'Our Hero, Their Spy' अशी ठेवण्यात आली आहे. रॉ चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबी गरेवाल यांनी केले आहे. तसेच देशभक्तीच्या खऱ्या कथेवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यामध्ये जॉन अब्राहम 26 वर्षीय तरुणापासून ते 82 वर्षीय वृद्धाच्या भुमिकेतून दिसून येणार आहे. या चित्रपटासाठी जवळजवळ त्याने 28 लुक बदलले आहे. तर ट्रेलरमध्ये जॉनचे हेच लुक्स दाखवण्यात आले आहेत.
चित्रपटाची कथा ही खऱ्या घटनेवर आधारित असून 1971 रोजी पाकिस्तान युद्धादरम्यान घडलेली आहे. जॉनसोबत या चित्रपटात मौनी रॉय, जॅकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमूर्ति आणि सिंकदर खेर झळकणार आहेत. रॉ चित्रपटाची शूटिंग गुजरात, नेपाळ आणि काश्मिर येथे करण्यात आले आहे. मात्र यापूर्वी सुशांत सिंह या चित्रपटातून मुख्य भुमिका साकारणार होता. येत्या 5 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.