Rohit Shetty New Web Series (Photo Credit - Instagram)

जर तुम्ही रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) अॅक्शन चित्रपटांचे (Action Movie) शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अॅक्शनचा डबल डोस देण्यासाठी, रोहित शेट्टी प्राईमवर (Prime Video) त्याची वेब सीरिज (Web Series) घेऊन येत आहे, ज्यामध्ये भरपूर मनोरंजन आणि नवीन पोलिसाची एन्ट्री असेल. होय, सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशीनंतर आता रोहित शेट्टी नवा पोलिस घेऊन येत आहे. 'शेरशाह'मध्ये सैनिकाची भूमिका करून लोकांची मने जिंकल्यानंतर आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Siddharth Malhotra) त्याच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सिध्दार्थ आता रोहित शेट्टीसोबत काम करणार आहे आणि या प्रोजेक्टमधून त्याने त्याची पहिली झलकही दाखवली आहे आणि तो स्क्रीनवर एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच रोहित शेट्टीबद्दल ही एक मोठी घोषणा आहे की ते या प्रोजेक्टद्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

सिद्धार्थने व्हिडिओ केला शेअर 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

सिध्दार्थला अनेक सेलिब्रिटींच्या शुभेच्छा

सिद्धार्थने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच, अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. करण जोहरपासून अनेक सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या. ही बातमी समोर आल्यानंतर सिद्धार्थच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की सिद्धार्थ पोलिसाच्या गणवेशात जबरदस्त शोभत आहे.