विलासराव देशमुख यांच्या जीवनावर रितेश देशमुखला बनवायचा आहे बायोपिक; दाखवायचा आहे एक सरपंच ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास
Riteish Deshmukh (Photo Credits: Instagram)

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक (Biopic) बनवण्याचा ट्रेंड आहे. विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तींवर बायोपिक बनत आहेत. आता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचेही नाव यामध्ये जोडले जाणार आहे. आपले वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याची रितेश देशमुख यांची इच्छा आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन होईल आणि आपल्या वडिलांच्या जीवन प्रवासाला न्याय देता देईल अशा कथेचा शोधात रितेश देशमुख आहे.

या बायोपिक विषयी बोलताना रितेश म्हणाला, ‘आपल्या वडिलांचा प्रवास हा मानवाच्या चमत्कारिक प्रवासापैकी एक आहे. त्यांनी सरपंच (ग्रामसभेचे प्रमुख) म्हणून सुरुवात केली आणि राज्याचे मुख्यमंत्री बनण्यापर्यंत झेप घेतली. याआधी लोकांनी त्यांच्या आयुष्यावर अनेक कथा लिहिल्या, मला दाखवल्या. मात्र यावर चित्रपट बनवणे हे सोपे नाही.

रितेश देशमुख पुढे म्हणाला, 'जेव्हा एखादा विषय तुमच्या काळजाच्या अगदी जवळचा असतो, तेव्हा तुम्ही वस्तुनिष्ठता विसरता. समजा मी त्यांच्या जीवनावर एखादा चित्रपट बनविला, तर लोक असे म्हणू शकतात की मी फक्त त्यांचे चांगलेच गुण दाखवले व आयुष्यातील इतर पैलू दाखवले नाही. जर कोणी दुसऱ्याने चित्रपट बनविला, तर मी म्हणेन की, ते असे नव्हते, ते तसे होते इ. तर अशाप्रकारे बायोपिकमध्ये लोकांच्या मतांमध्ये अंतर असते. बायोपिक सारख्या चित्रपट विषयावर लोकांचे भिन्न विचार असतात.’ (हेही वाचा: Sooryavanshi: अक्षय कुमार याने खास व्हिडिओ शेअर करत जाहीर केली 'सूर्यवंशी' सिनेमाची रिलीज डेट; या दिवशी ट्रेलर होणार आऊट (Watch Video))

मात्र कधीतरी आपण आपल्या वडिलांच्या आयुष्यावर चित्रपट जरूर बनवू, अशी रितेश देशमुखला आशा आहे. बागी 3 च्या प्रमोशन इव्हेंट दरम्यान रितेशने मीडियाशी संवाद साधला. तो पुढे म्हणाला, ‘जेव्हा आपण एखाद्याच्या जीवनावर एखादे पुस्तक लिहिता, तेव्हा आपण 500 किंवा 600 पृष्ठे लिहू शकता. परंतु 2 तासांच्या चित्रपटात एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे सर्व पैलू दर्शविणे फार अवघड आहे. यामध्ये आपण अयशस्वी झाल्यास, बायोपिक कंटाळवाणा होतो.'