रितेश देशमुख लॉकडाऊनमध्ये चालवतोय गाडी; व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
रितेश देशमुख (PC - Instagram)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या आपली पत्नी जेनेलिया देशमुख आणि मुलांसोबत वेळ घालवत आहे. रितेश सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. त्याने आतापर्यंत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विविध टिक टॉक व्हिडिओ शेअर केले आहेत. अशातचं आता रितेशने लॉकडाऊन काळात गाडी चालवण्याची इच्छा झाल्यास मनाची अवस्था सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

रितेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश गाडी चालवण्याची अॅक्टिंग करताना दिसत आहे. विशेष म्हणजे रितेशने या व्हिडिओला काही इफेक्ट्स दिले आहेत. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, रितेशचे दोन्ही हात-पाय काम करत आहेत आणि तो हवेत तरंगत आहे. रितेशने या व्हिडिओला 'लॉकडाऊनमध्ये जेव्हा गाडी चालवण्याची इच्छा होते,' अशी कॅप्शन दिली आहे. (हेही वाचा - विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मुलगा रितेश ने वडिलांच्या पोशाखासह केले असे काही जे पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतील, पाहा भावूक व्हिडिओ)

रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्टस् केल्या आहेत. सध्या रितेश देशमुख लॉकडाऊनचा चांगला फायदा घेत असून वेगवेगळे टिक टॉक व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. रितेशने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा एक भावूक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.