लॉकडाऊन (Lockdown) सध्या सर्व देशवासिय घरात आपल्या कुटूंबियांसोबत वेळ घालवत आहे. अशातच नेहमीच आपल्या बिझी शेड्यूलमुळे स्वत: साठी वेळ द्यायला न मिळाल्यामुळे दु:खी असलेले सिनेकलाकार मात्र सध्या छान वेळ घावलत आहे. यात टिकटॉक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. यात टिकटॉक वर अनेक बॉलिवूड कलाकार प्रसिद्ध झाले असून त्यांचे फॉलोअर्सही प्रचंड आहेत. यातच एक नाव आवर्जून घेतलं जात आहे ते म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh). रितेश देशमुख अनेक मजेशीर, धमाल व्हिडिओ शेअर करुन आपल्या चाहत्यांना खूश ठेवत आहे. नुकताच त्याने एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात चक्क त्याचे डोके धडापासून वेगळे होऊन चालताना दिसत आहे.
हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून इन्स्टाग्राम वर आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया च्या प्रेमाला लॉकडाऊन काळात आला बहर, संजय दत्त च्या लोकप्रिय गाण्यावर बनवला TikTok व्हिडिओ
पाहा हा मजेशीर व्हिडिओ:
अलीकडेच रितेश ने त्याचा हटके लूक मधील व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये रितेश आपल्या घरातील आरसा पुसत आहे. हे करत असताना अचानक तो आरशात पाहतो आणि त्याचा एक वेगळा लूक समोर येतो. हा लूक पाहून तो स्वत:ला 'मैं हू खलनायक' असे संबोधत आहे.
काही दिवसांपूर्वी यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जेनेलिया रितेश देशमुख कडून घरातील भांडी घासण्याचे काम करुन घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रितेश बिचारा भांडी घासत आहे आणि त्याला दमदाटी करण्यासाठी जेनेलियाने हातात लाटणं घेतले आहे. या व्हिडिओमागे 'मौका मिलेगा तो हम बतादेंगे' हे गाणं खूपच जुळून आले आहे.