Rana Daggubati-Miheeka Bajaj Wedding (Photo Credits: Instagram)

Rana Daggubati-Miheeka Bajaj Wedding: गेल्या कित्येक दिवसापासून धामधूम सुरु असलेल्या अभिनेता राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचा लग्नसोहळा (Rana Daggubati-Miheeka Bajaj Wedding) अगदी थाटामाटात पार पडला. लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरस मुळे या लग्नसोहळ्याला मोजकीच आणि जवळचे पाहुणे उपस्थित होते. हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. हे लग्न तेलुगू आणि मारवाडी या दोन्ही पद्धतीने संपन्न झाले. सोशल डिस्ंटसिंगचे भान राखत अगदी योग्य ती काळजी घेत अगदी थाटामाटात हे लग्न लावण्यात आले. या लग्न सोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

त्यासोबतच राणा-मिहिकाला त्यांचे चाहेत, मित्रपरिवार, नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील मंडळी सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.

पाहा या लग्नसोहळ्याचे टिपलेले सुरेख क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by Miheeka 💙 (@miheekabajaj) on

हेदेखील वाचा- Rana Daggubati And Miheeka Bajaj's Wedding: खिलाडी अक्षय कुमार ने लग्नाच्या बेडीत अडकणा-या राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज ला आपल्या विनोदी अंदाजात दिल्या हटके शुभेच्छा, पाहा ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Miheeka 💙 (@miheekabajaj) on

मे महिन्यात राणा दुग्गबती याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रेयसीचा म्हणजेच मिहिकाचा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती.

 

View this post on Instagram

 

😍

A post shared by Miheeka 💙 (@miheekabajaj) on

राणाने मिहिका सोबत शेअर केलेल्या फोटोला 'आणि तिने होकार दिला,' असे कॅप्शन दिले होते. मिहिका ही इंटेरिअर डिझायनर असून 'ड्यू ड्रॉप डिझाईन' या स्टुडिओ या कंपनीची मालकीण आहे. 'ड्यू ड्रॉप डिझाईन' ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. विशेष म्हणजे मिहिकाची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर आहे.