Rakhi Sawant's Brother Arrested: राखी सावंतचा भाऊ Rakesh Sawant याला मुंबई पोलिसांकडून अटक, जाणून घ्या काय आहे गुन्हा
Rakhi Sawant | (Photo Credit - Twitter/ANI)

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही काळापूर्वी तिने आदिल दुर्रानीसोबत लग्न केल्याचा दावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. यानंतर तिने पतीविरुद्ध फसवणुकीचा आरोप करत गुन्हाही दाखल केला होता. राखीमुळे आदिललाही तुरुंगाची हवा खावी लागली. आता राखीनंतर तिचा भाऊही प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेक बाऊन्स प्रकरणी राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत (Rakhi Sawant) याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटक केल्यानंतर त्याला सोमवारी (8 मे) न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राकेशविरुद्ध 2020 मध्ये एका व्यावसायिकाने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात त्याला तीन वर्षांपूर्वी तुरुंगातही जावे लागले होते.

त्यानंतर चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाने हे पैसे व्यावसायिकाला परत करण्याच्या अटीवर त्याचा जामीन मंजूर केला होता. मात्र, राकेशने हे पैसे परत केले नाहीत. आता त्याला अटक करण्यात आली. (हेही वाचा: 'The Kerala Story' Controversy: 'द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्या'- NCP MLA Jitendra Awhad)

याआधी राकेशने आदिलवर गंभीर आरोप केल्याने तो चर्चेत आला होता. त्याने सांगितले होते की, ज्या दिवशी राखीची आई जया यांचे निधन झाले, त्याच दिवशी आदिलने त्याच्या बहिणीला म्हणजेच राखीला मारहाण केली होती. आपल्या वक्तव्यात राकेश म्हणाला होता, ‘आमच्या आईचा मृत्यू झाला त्यादिवशी आदिलने राखीला खूप मारहाण केली होती. तिच्या शरीरावरील मारहाणीच्या खुणा होत्या. त्याने माझ्या बहिणीला जनावरासारखे वागवले.’ राखीच्या पैशातून आदिलने दुबईत घरही विकत घेतल्याचा आरोप राकेशने केला होता.