Kiss Controversy नंतर अनेक वर्षांनी Rakhi Sawant व Mika Singh यांची भेट; आपण आता मित्र असल्याची मिडियासमोर कबुली (Watch Video)
मिका सिंग व राखी सावंत (Photo Credit Instagram)

राखी सावंत (Rakhi Sawant) हे बॉलिवूडमधील असे एक नाव जिला स्वतःच्या पब्लिसिटीसाठी वेगळे काही करायची गरज भासत नाही. तिचे व्यक्तिमत्वच तिला प्रसिद्धी मिळवून देत असते. 2006 मध्ये अभिनेत्री राखी सावंत आणि गायक मिका सिंगच्या (Mika Singh) कुप्रसिद्ध चुंबनामुळे (Kiss) मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यावेळी जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये, वृत्तवाहिनीवर राखी-मिकाची बातमी प्रकाशित झाली होती. त्यानंतर इतके वर्ष राखी व मिका एकमेकांना पाण्यात बघत होते. 2006 नंतर या दोघांमधील शत्रुत्व वेळोवेळी दिसून आले आहे. मात्र आता पुन्हा या दोघांमध्ये मैत्री झाल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी व मिका दोघेही एकमेकांना मिठी मारताना आणि एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.

2006 मध्ये मिकाने आपल्या वाढदिवसाच्या बॅशमध्ये राखी सावंतचे जबरदस्तीने चुंबन घेतले होते. मिका व राखीचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर राखीने मिकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे, राखीने आधी आपले चुंबन घेतल्याचे मिकाने म्हटले होते. आता जवळजवळ 15 वर्षानंतर राखी व मिका पुन्हा मित्र म्हणून एकत्र आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राखी एके ठिकाणी उभी राहून कोल्ड ड्रिंक घेत  आहे व त्याचवेळी मिकाची गाडी त्या रस्त्यावरून जात होती. राखीला पाहून मिका तिला भेटण्यासाठी येत आहे. मिका जवळ येताच राखी ‘सिंग इज किंग’ असे ओरडू लागते. त्यानंतर ती सलमानने आपल्या मदत केल्याचे सांगते यावर मिका, मी इकडून जात होतो मात्र राखीला पाहून थांबलो असे म्हणतो. यावर राखीही आता आम्ही मित्र असल्याचे सांगते. त्यानंतर बिग बॉस फक्त राखीमुळे चालल्याचे मिका सांगतो. यावर राखीदेखील मिका कशी लोकांना मदत करत आहे याचे गोडवे गाताना दिसत आहे.

तर अशा प्रकारे आता 15 वर्षानंतर मिका व राखी मित्र म्हणून पुन्हा एकत्र आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांसाठी ही आनंदाची असणार बातमी आहे. दरम्यान,  त्या पार्टीबद्दल बोलताना मिका सांगतो की, वाढदिवसाच्या पार्टीमध्ये राखीला निमंत्रण नव्हते. एका निर्मात्यासोबत ती तिथे आली होती. केक कापल्यानंतर तिने जबरदस्तीने मिकाच्या चेहऱ्याला केक फासायला सुरुवात केली व त्यानंतर तिला धडा शिकवायला मिकाने तिचे चुंबन घेतले.