Mere Pyare Prime Minister Trailer: देशातील स्वच्छतेच्या समस्या आणि महिलांची सुरक्षितता यावर भाष्य करणाऱ्या 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित!
Mere Pyare Prime Minister Trailer (Photo Credits: Youtube)

Mere Pyare Prime Minister Trailer: 'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग', 'मिर्ज्या' आणि 'दिल्ली 6' या दमदार सिनेमांनंतर राकेश ओम प्रकाश मेहरा एका नवा कोरा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' (Mere Pyare Prime Minister) असे या सिनेमा नाव असून सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अंजली पाटील, मकरंद देशपांडे, रसिका अगाशे, सोनिया अल्बिज़ुरी, अतुल कुलकर्णी आणि नचिकेत पूर्णापत्रे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शंकर-एहसान-लॉय यांनी सिनेमाला संगीत दिले असून गीतांचे शब्द गुलजार यांच्या लेखणीतून अवतरले आहेत.

उघड्यावर शौच करणे आणि इतर स्वच्छतेच्या समस्या या मुद्यांवर हा सिनेमा बेतलेला असून झुग्गीच्या एका मुलगाद्वारे ही कथा सिनेमात सांगण्यात येणार आहे.

तुम्हीही पहा सिनेमाचा ट्रेलर-

ट्रेलर लॉन्च नंतर राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी सांगितले की, "महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे 'सरगम'ची कथा सांगणे अत्यंत गरजेचे आहे."

या सिनेमाची निर्मिती डॉ. जयंतीलाल गडा (पेन) आणि पीव्हीआर सिनेमा एकत्रितपणे करत आहेत. हा सिनेमा 15 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.