Rajinikanth's Birthday Cake (Photo Credits: Twitter)

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) 70 वर्षांचे झाले आहेत. रजनीकांत यांनी आपला वाढदिवस शहराबाहेरील फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबातील सदस्यांसह अतिशय साधेपणाने साजरा केला. काही दिवसांपूर्वी राजकारणात अधिकृत प्रवेश करणाऱ्याची घोषणा करणाऱ्या रजनीकांत यांनी वाढदिवसाचा जो केक (Birthday Cake) कापला तो सध्या चर्चेत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या केकवर राजकीय कारकीर्द सुरू होण्याची झलक पाहायला मिळाली. रजनीकांत यांच्या वाढदिवसाच्या केकचे फोटो त्यांची मुलगी सौंदर्या (Soundarya) रजनीकांत यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हा खास फोटो शेअर करताना सौंदर्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हॅपी बर्थडे माय लाइफ... डियर अप्पा.' यासह तिने काही खास हॅशटॅगसुद्धा वापरले आहेत. रजनीकांत यांच्या बर्थडे केकवर लिहिले होते, ‘आता किंवा कधीच नाही (Now or Never).’ यावरून हे स्पष्ट होत आहे की रजनीकांत आपल्या केकद्वारे राजकारणातील आगमाची झलक दाखवत आहेत. काही काळापूर्वी, तामिळ सुपरस्टार रजनीकांतने यांनी आपला राजकीय चित्रपट प्रदर्शित करण्याचीही घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याच्या शक्यतांना विराम देऊन रजनीकांत यांनी आपला नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी ट्वीट करत माहिती दिली होती की, 31 डिसेंबर रोजी ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करतील आणि पुढील वर्षी जानेवारीत त्याची सुरूवात करतील. त्यांचा पक्ष तामिळनाडू विधानसभेसाठी निवडणूक लढवेल. रजनीकांत यांचे समर्थक नव्वदच्या दशकापासूनच या घोषणेची प्रतीक्षा करत होते. (हेही वाचा: वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत साकारले सुंदर सँडआर्ट!)

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही विधानसभा निवडणुका नक्कीच जिंकू. आम्ही प्रामाणिक, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि अध्यात्मिक राजकारण करू. त्याच्या जोरावर बदल आणि आणि चमत्कार नक्कीच घडतील.’ पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपसह सर्वच पक्ष रजनीकांत यांच्या घोषणेची वाट पाहत होते. मात्र, आता रजनीकांत यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केल्याच्या घोषणेने भाजपला धक्का बसू शकतो. कारण भाजप त्यांना आपल्या गोटात सामील करू इच्छित होता.