राज कपूर यांचा 23 वर्षीय मुलगा शारुक कपूर याचे मक्का तीर्थ यात्रेदरम्यान निधन
Sharook Kapoor (Photo Credits: Facebook)

प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) यांचा मुलगा शारुक कपूर (Sharook Kapoor) याचे निधन झाले आहे. तो अवघ्या 23 वर्षांचा होता. मीडिया रिपोर्टनुसार, शारुक आपली आई सलीजा कपूर (Saleeja Kapoor) सह मक्का (Mecca) तीर्थयात्रेला गेला होता. तेथे त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मक्का वरुन चेन्नई (Chennai) येथे त्याचे पार्थिव आणण्यात येईल. मात्र मक्का येथील आंतरराष्ट्रीय नियम पाहता पार्थिव चेन्नई आणण्यास काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे देखील बोलले जात आहे. (टीव्ही अभिनेत्री S. Devi हिने पतीसमोर केलेल्या बेदम मारहाणीत एक्स बॉयफ्रेंडचा मृत्यू)

आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत शारुक याला देखील सिनेसृष्टीत काम करण्याची इच्छा होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर तो सिनेसृष्टीत पर्दापण करणार होता. सध्या शारुक चेन्नईतील एका कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत होता. शारुकच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण तामिळ सिनेसृष्टीला जबर धक्का बसला आहे. (बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड; आरोपीला अटक)

शारुक हा मार्वलचा मोठा चाहता होता. तसंच स्टेन ली आणि त्यांचे सुपरहिरोज देखील त्याच्या आवडीचे होते. राज कपूर यांनी तामिळ सिनेमा Thalattu Ketkuthamma मधून आपल्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीची सुरुवात केली. या सिनेमात प्रभु गणेशन आणि कनका यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक तामिळ सिनेमे आणि  तामिळ मालिकांमध्येही काम केले.