Radhe Shyam Movie Advance Booking: 'राधे श्याम' चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीचं दिसली प्रभासची जादू; अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने कमावले 'इतके' कोटी
Radhe Shyam Movie (PC - Twitter)

Radhe Shyam Movie Advance Booking: साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) च्या 'राधे श्याम' (Radhe Shyam) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून हा चित्रपट अखेर उद्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोरोनामुळे बॉक्स ऑफिसवर पडलेला दुष्काळ हटवण्यासाठी 'राधे श्याम अॅडव्हान्स बुकिंग' (Radhe Shyam Advance Booking) कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत हा मेगा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

प्रभासची क्रेझ अॅडव्हान्स बुकिंगमध्ये स्पष्टपणे दिसून आली आहे. चित्रपटाच्या प्रीमियरसाठी प्रेक्षक आपली जागा बुक करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. अशा स्थितीत उद्या अनेक रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. (वाचा - Rakesh-Shamita Breakup: अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचा ब्रेकअप झाला? अफवेवर जोडप्याने दिली 'ही' प्रतिक्रिया)

रिपोर्टनुसार, 'राधे श्याम' चित्रपटासाठी हैदराबादमध्ये 4 कोटींहून अधिकची आगाऊ बुकिंग झाली आहे. हे आकडे पाहून हैदराबादमध्ये चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळणार आहे हे निश्चित आहे. Andhraboxoffice.com च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने थिएटर राइट्समधूनचं जवळपास 210 कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये केवळ तेलगू राज्यांमध्ये हक्क विकून 100 कोटी रुपये मिळाले आहेत. या चित्रपटाची कथा राधा कृष्ण कुमार यांनी लिहिली आहे.

दक्षिणेबरोबरचं हा चित्रपट हिंदी भाषिक राज्यांमध्येही विक्रमी कमाई करण्याची शक्यता आहे. 'राधे श्याम' या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे यांची जोडी एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.