Pushpa2 Box Office Collection: सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2: द रुल बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. या चित्रपटाने हिंदी भाषेत तिसऱ्या वीकेंडमध्ये 50 कोटींहून अधिक कमाई करून एकूण 692.50 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे नवीन चित्रपट प्रदर्शित होऊनही पुष्पा २ वर कोणताही परिणाम झालेला नाही. तिसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटाने शुक्रवारी 12.50 कोटी, शनिवारी 20.50 कोटी आणि रविवारी 27 कोटींचा व्यवसाय केला. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Pushpa 2 Box Office Collection Day 5: 'पुष्पा 2: द रुल'ची कमाई घटली, पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी )
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
या चित्रपटाने सलग तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. चित्रपटाच्या उत्कृष्ट कामगिरीवरून हे स्पष्ट होते की पुष्पा 2 ने केवळ त्याच्या चाहत्यांनाच प्रभावित केले नाही तर बॉक्स ऑफिसवर एक नवीन विक्रमही प्रस्थापित केला आहे.
पुष्पा 2 च्या तेलुगू व्हर्जनने 18 दिवसांत 307 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तेलगू आवृत्तीच्या कमाईतही घट झाली आहे. तर बाहुबली या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने ३३९ कोटींचा व्यवसाय केला आहे आणि आजतागायत पुष्पा या चित्रपटाला पार करता आलेली नाही. तर RRR हा तेलगू आवृत्तीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. RRR ने 431 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. हे लक्ष्य पार करणे पुष्पा २ साठी कठीण काम आहे.