Pushpa 2-The Rule Teaser: अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी येणार 'पुष्पा 2'चा टीझर; 'ही' अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका
Pushpa (PC - Facebook)

Pushpa 2-The Rule Teaser: अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या 'पुष्पा: द राइज' या तेलगू भाषेतील चित्रपटाने जगभरात खळबळ उडवली होती. 2021 मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटापासूनचं प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी निर्माते खूप मेहनत घेत आहेत. आता याबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा 2: द राइज'चा टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला रिलीज होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा एक अॅक्शन सीन बेंगळुरूमध्ये शूट केला जात आहे. लवकरच मल्याळम अभिनेता फहाद फाजील यात सामील होणार आहे. पुढील महिन्यात अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. अशात निर्माते अभिनेत्याच्या खास दिवशी तीन मिनिटांचा अ‍ॅक्शन पॅक्ड टीझर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. अल्लू अर्जुन 8 एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करणार आहे. (हेही वाचा -Theft At Rajinikanth's Daughter Aishwarya's House: रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचे सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरीला, एफआयआरमध्ये 'या' लोकांवर वाढला संशय)

'पुष्पा'च्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते त्याच्या सिक्वेलसाठी आणखी मेहनत घेत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शक सुकुमारनेही टीझरच्या अंतिम कटला होकार दिल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटाचा टीझर आणि इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, 'पुष्पा 2' मध्ये साई पल्लवी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 'पुष्पा' 17 डिसेंबर 2021 रोजी रिलीज झाला होता. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फाजील देखील दिसले होते.