भारतातील कोविड-19 रुग्णांना मदत करण्यासाठी Priyanka Chopra चा पुढाकार; Video शेअर करत केले मदतीचे आवाहन
Priyanka Chopra (Photo Credits: Instagram/@team_pc)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णवाढीचे प्रमाण मागील महिन्यापासून वाढत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. ऑक्सिजन, बेड्स, रेमडेसिवीर औषधं यांच्या कमतरतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देशाच्या या बिकट परिस्थितीवर देसी गर्ल आणि ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा  (Priyanka Chopra) हिने गरजूंच्या मदतीसाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे. (Priyanka Chopra व्हिडिओ शेअर करत आपल्या सोशल मिडियावरील असंख्य चाहत्यांना भारताला मदत करण्याचे केले आवाहन, दिली 'ही' महत्त्वाची माहिती)

प्रियंका चोप्राने भारतातील सध्याच्या कोरोना स्थितीवरील व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रियंकाने लिहिले की, "कोविड-19 चे दुष्परिणाम रोखण्यासाठी भारताची लढाई सुरु आहे. गिव्ह इंडिया ला दिलेले तुमचे योगदान मोठा बदल घडवून आणू शकतात. तुमचे योगदान अनेक आयुष्य वाचवू शकतं. भारतासाठी एकत्र या."

प्रियंका चोप्रा ट्विट:

प्रियंका चोप्राने या ट्विटमध्ये एक लिंक देखील शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक करुन लोक कोरोना लढाईत आपले योगदान देऊ शकतात. दरम्यान, प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून या कठीण काळात शक्य ती मदत करण्यात दोघेही पुढे सरसावले आहेत.