इटली मध्ये सुट्टी एन्जॉय करताना प्रियंका चोपड़ा ची स्विमिंग पूलमधील हॉट फोटो तुम्ही पाहिले का?
priyanka Chopra Pics (Photo Credits: Instagram)

आपल्या फॅशन सेन्स आणि मादक अदांमुळे नेहमी चर्चेत असलेली प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) सध्या आपल्या पती निक जोनस (Nick Jonas) सोबत इटलीमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. या सुट्ट्यांचे फोटोज ती आपल्या सोशल अकाउंटवर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस चा एक व्हिडियो समोर आला होता. ज्यात ते दोघे एका सुंदर संध्याकाळी एक सुंदर असा रोमँटिक डान्स करत होते. हा डान्स पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षावच करत होते. त्यातच आता प्रियंका ने या सुट्ट्यांमधील आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये प्रियंका स्विमिंग पूल मध्ये मनसोक्त भिजताना दिसत आहे. त्यात तिने पांढ-या रंगाचा स्विम सूट परिधान केला आहे. ज्यात ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Best use of a vacation. The hubby taking pictures. Lol 😝 📷@nickjonas 👙 ☀️ 🍸 💏

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

हे फोटो खुद्द निक ने क्लिक केल्यामुळे तिने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर प्रियंका चोपड़ा आणि निक जोनस आपले फोटो शेअर करतच असतात. ज्यात या दोघांमध्ये भन्नाट केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते.

प्रियंका च्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ब-याच काळानंतर 'द स्काय इज पिंक' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबच फरहान अख्तर आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट 11 ऑक्टोबर ला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.