Priyanka Nick Wedding: शाही विवाहसोहळ्यासाठी प्रियंका-निक जोधपूरमध्ये दाखल (Photos)
प्रियंका चोप्रा आणि निक चोप्रा (Photo Credits: Yogen Shah)

Priyanka Nick Wedding : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अमेरिकन सिंगर निक जोनस (Nick Jonas) लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. आजपासून यांच्या लग्नविधींना सुरुवात होणार असून 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर 3 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने हे कपल विवाहबद्ध होणार आहे. हा शाही विवाहसोहळा जोधपूरच्या (Jodhpur) उमेद भवन पॅलेसमध्ये (Umaid Bhawan Palace) रंगणार आहे. त्यासाठी आजच प्रियंका निक जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत. Priyanka Chopra चं कन्यादान करणार 'हे' जोडपं !

आज प्रियंकाचा मेंहदी सोहळा रंगणार आहे. प्रियंका निक लग्नाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जोधपूरला रवाना होण्यापूर्वी काल प्रियंकाच्या घरी गणेश पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रियंका निक पारंपरीक वेशात दिसून आले.