काल (14 फेब्रुवारी, 2019) सगळीकडे व्हेलेंटाईन डे (Valentine's Day) ची धूम होती. सामान्यांपासून अगदी बॉलिवूड सेलिब्रेटीपर्यंत अनेकांनी 'व्हेलेंटाईन डे' अगदी उत्साहात साजरा केला. यात नवविवाहित दांपत्य प्रतिक बब्बर (Prateik Babbar) आणि सान्या सागर (Sanya Sagar) यांचा 'व्हेलेंटाईन डे' चा खास फोटो सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. प्रतिकने पत्नी सान्या सोबतचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात सान्या आणि प्रतीक दोघेही टॉपलेस आहेत.
हा फोटो शेअर करत प्रतिकने लिहिले की, "मोर लाईक इट... हॅप्पी व्हेलेंटाईन्स डे..."
23 जानेवारीला प्रतिक आणि सान्या दोघेही विवाहबद्ध झाले. लखनऊमध्ये मराठी परंपरेनुसार दोघांचा विवाहसोहळा पार पडला. 2017 पासून प्रतिक आणि सान्या रिलेशनशीपमध्ये असून 2018 च्या सुरुवातीला दोघांचा साखरपूडा झाला होता. प्रतिक-सान्या यांच्या विवाहसोहळ्याचे खास फोटोज
गेल्या वर्षी आलेल्या 'मुल्क' सिनेमात प्रतिक बब्बर झळकला होता. यात तापसी पन्नू आणि ऋषी कपूर प्रमुख भूमिकेत होते.