Poonam Pandey (Photo Credits: Insta)

अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिस पोर्नोग्राफी प्रकरणा (Raj Kundra Adult Case) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) कडून दिलासा मिळाला आहे. पूनम पांडे हिच्यावर राज कुंद्रा पोर्नोग्राफी केस (Raj Kundra Adult Case) प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पूनमने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दिलासा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. जी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर पूनम पांडे हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने पूनमला दिलासा दिला आहे. पूनम पांडे हिच्यावर 2020 मध्ये पोर्नोग्राफई प्रकरणाद पहिला गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण राज कुंद्रा यांच्याशी संबंधीत होते.

बार अँड बेंच ने दिलेल्या एका वृत्तानुसार, न्यायाधीश विनीत सरन आणि न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाने पूनम पांडे हिच्या याचिकेवर सुनावणी केली. या सुनावणीत तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर दाखल याचिकेवर नोटीस जारी केली आहे. यात अभिनेत्रीची याचिका फेटाळून लावण्याबाबत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्याविरोधात (पूनम पांडे) कोणताही दंडात्मक कारवाई केली जाऊ नये. (हेही वाचा, Poonam Pandey हिचा नवरा सॅम बॉम्बे 'या' कारणामुळे झाला संतप्त, रागात असल्याने भितींवर आपटले अभिनेत्रीचे डोके)

Poonam Pandey | (Photo Credits: Facebook)

अश्लील आशय असलेली सामग्री बनविणे आणि ती सोशल मीडियावर अपलोड करणे या प्रकरणात पूनम पांडे हिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांच्याशी संबंधित होते. 30 वर्षीय पूनम पांडे हिने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याजिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने 25 नोव्हेंबर 2021 रोजी फेटाळून लावली होती. त्यानंतर पूनम पांडे हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळून लावताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते की, पूनम पांडे ही चौकशीसाठी सहकार्य करत नाही. त्यामुळे तिचे वर्तन पाहून तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्यात येत आहे.3

न्यायालयाच्या आदेशावर पूनम पांडे हिच्या वकिलाने म्हटले होते की, पूनम ही तपास अधिकाऱ्यांना योग्य सहकार्य करण्यास तयार आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या कोणत्याही अटी आणि शर्थींचे ती पालन करेन. वकीलाने असेही म्हटले होते की, अशाच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एका अभिनेत्याला दिलासा दिला होता. तसाच दिलासा पूनम हिलाही देण्यात यावा. तरीही न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली होती.