मोहंजोदाडो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: पूजाने सोशल मिडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. 'आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आपण स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे' असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आतापर्यंत बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळींपासून रणबीर कपूर, आलिया भट, आर माधवन, आमिर खान, मिलिंद सोमण, सोनू सूद यांसारख्या बड्या स्टार्सचा समावेश आहे.
पूजा हेगडे हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटेल आहे की, "मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, मी कोरोना संक्रमित झाली आहे. सर्व नियमांचे पालन पालन करून मी स्वत:ला आयसोलेट आणि होम क्वारंटाईन केले आहे. मागील काही दिवसांत जे कोणी लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनीही आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते."हेदेखील वाचा-
पूजा पुढे म्हणते, "तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि दिलेल्या पाठबळाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. माझी तब्येत आता ठिक आहे. तुम्ही सर्वही घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या". दरम्यान ट्विटरवर #PoojaHegde ट्रेंड होत आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहे.
पूजा हेगडेच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले तर, अभिनेता प्रभाससह राधे-श्याम या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय ती रणवीर सिंह स्टारर 'सर्कस' या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी याने केले आहे.