Photo: 'कांटा लगा' गाण्यातून अनेकांचा कलेजा खलास करणाऱ्या शेफाली जरीवाला पाहा दिसते कशी
शेफाली जरीवाला (Photo Credits: Youtube)

बॉलिवुड अबिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Zariwala) हिने चित्रपटांपेक्षाही संगीत अल्बम आणि गाण्यांच्या व्हिडिओद्वारेच करिअर करण्यास अधिक पसंती दिली. 'कांटा लगा' (Kaanta Laga ) या गाण्यात ती झळकली आणि अनेकांचा कलेजा खलास झाला. हे गाणे तेव्हा प्रचंड गाजले. आजही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. बार, पब्ज, पार्टी आणि वरात, मिरवणूक अशा अनेक कार्यक्रमांतून हे गाणे आजही डीजेवर वाजते. हे गाणे खरे तर रिमिक्स व्हर्जन होते. शेफाली जरीवाला हिने पुढे अभिनयात फारशी आघाडी घेतली नाही. पण, या गाण्यामुळे ती चांगलची प्रसिद्धीच्या झातात आली. या गाण्यातील व्हिडिओमध्ये तिचा हॉट अंदाज लोकांना चांगलाच भावला. शेफालीच्या चाहत्यांसाठी तिचे काही खास फोटो आम्ही येथे देत आहोत.

पती पराग त्यागी याच्यासोबत मुंबई एअरपोर्टवर शेफाली जरीवाला छायाचित्रकारांच्या नजलेस पडली. मग छायाचित्रकारांच्या कॅमेरऱ्यांनी तिची हॉट अदा टीपली. काळ्या रंगाची ट्रॅक पॅंट आणि स्टायलिश टॉप अशा पेहरावात शेफाली आजही तितकीच हॉट वाटते. जितकी 'कांटा लगा' गाण्यात वाटते. या फोटोत तुम्ही तिला पाहू शकता. (हेही वाचा, डोळा मारल्याचा व्हिडिओ पाहून दिग्दर्शकही प्रिया वारियार हिच्या प्रेमात, चित्रपटात दिली प्रमुख भूमिका)

शेफाली जरीवाला और पराग त्यागी (Photo Credits: Yogen Shah)

श्रेयस तळपदे यांच्या 'बेबी कम ना' या चित्रपटात शेफाली नुकतीच चाहत्यांच्या भेटीला आली होती.

शेफाली जरीवाला और पराग त्यागी (Photo Credits: Yogen Shah)

2009 मध्ये तिने सिंगर-कंपोज हरमीत सिंह (Harmeet Singh) याच्यासोबत विवाह केला. मात्र, अल्पावधीतच दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अभिनेता पराग त्यागी (Parag Tyagi) याच्यासोबत 2014 मध्ये विवाह केला. शेफाली छोट्या पडद्यांवर अनेक कार्यक्रमातून नजरेला आली आहे. ती डान्स रियालिटी शो 'नच बलिये 5' मध्येही नजरेस आली.