Paresh Rawal, New Chairperson of NSD: परेश रावल यांची 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'च्या अध्यक्षपदी नियुक्ती
Paresh Rawal (Photo Credits: Twitter)

सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (National School of Drama) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्याकडून परेश रावल यांच्याकडे NSD चे अध्यक्षपद सोपवण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश रावल यांनी आपले नाटकाबद्दलचे प्रेम यापूर्वी अनेकदा व्यक्त केले होते. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, "नाटक हे माझे पहिले प्रेम आहे आणि रंगमंचावर काम करताना मी अत्यंत आनंदी असतो. माझी मूळं ही नाटकाशी जोडली गेलेली आहेत. ज्या प्रेक्षकांना नाटकाचा आस्वाद घेता येतो. अशा लाईव्ह प्रेक्षकांसमोर काम करताना खूप आनंद होतो."

आपल्या 30 वर्षांच्या सिनेमा करिअरमध्ये परेश रावल यांनी अनेक सिनेमांत काम केले आहे. 1984 च्या वो छोकरी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून नॅशनल फ्लिम अॅवार्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. मनोरंजन क्षेत्रात परेश रावल यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान नव्या जबाबदारीसाठी याबद्दल केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Prahlad Singh Patel) यांनी परेश रावल यांचे अभिनंदन केले आहे.

Prahlad Singh Patel Tweet:

परेश रावल यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात 1982 मध्ये 'नसीब नी बलिहारी' या गुजराती सिनेमातून केली. परेश रावल हे आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. 'हेराफेरी', 'वेलकम', 'ओ माय गॉड' यांसारख्या अनेक सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 2019 मध्ये 'मेड इन चायना' या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'कुली नं. 1' आणि 'हंगामा 2'  या आगामी सिनेमातून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनमुराद हसवणार आहेत.